रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

प्रजासत्ताक दिन ( २६ जाने.२०१७ )


प्रजासत्ताक दिनाविषयी..... 

२६ जानेवारी २०१७  

                              २६ जानेवारी १९५० रोजी भारत देशाचा कारभार हा राज्यघटनेनुसार सुरु झाला म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. आपल्या दवणगांवातील जि प प्राथ शाळेत देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रोकडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, व ग्रामस्थ यांनी शाळेत उपस्थिती दर्शवली. 
                             प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे गाणी घेऊन त्यावर नृत्य सादर केले. काही मुलांनी भाषणे सादर केली.  पालकांनी, ग्रामस्थांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. पालकांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलांना बक्षिसे जाहीर केली. मुलांनाही खूप आनंद झाला.  
                            कार्यक्रमाच्या शेवटी शि.वि.अ.रोकडे साहेब, गावच्या सरपंच खपके ताई, पोलीस पाटील नंदू खपके, तसेच श्री. सुनील खपके  यांनी मुलांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनाप सर यांनी मुलांचे कौतुक केले. शाळेची माजी विद्यार्थिनी कु. कल्याणी संतोष खपके हिने मुलांना नृत्य शिकविण्यासाठी मार्गदर्शन केले. श्री अनाप सरांनी कल्याणीचे  कौतुक केले. त्यांनतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पुढील ग्रामस्थांनी बक्षिसे जाहीर केली 

१) सौ. सत्यभामा ताई खपके ( सरपंच )           :   १०१
२) श्री. नंदू पा. खपके ( पोलीस पाटील )           :   १०१
३) श्री. सुधाकर रोकडे (  शि.वि.अधिकारी )      :   १०१
४) श्री. किशोर पा. होन                                :   २०१
५) श्री. पांडुरंग गडकर                                :   १०१
६) श्री. सचिन पा. खपके                              :   ५१  
७) श्री. विलास पा. खपके                             :   ५१






  

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

Welcome to my new post...

नवीन अपडेट्स :-

शालेय पोषण आहार 

नवीन app  डाउनलोड करा
download mdm app 

 ( डाउनलोड करण्यापूर्वी आपल्या फोन मध्ये अगोदर असलेले MDM APP  हे Uninstall करा. )



 MDM APP SETTING
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 
नमस्कार मित्रांनो ,

                           आपणास mdm चे नवीन app डाउनलोड करून इंस्टॉल करावयाचे आहे.परंतु असे करताना काही मोबाईल मधे your device is allready registered  असा मेसेज येत आहे. यामुळे बऱ्याच मित्रांना इंस्टॉलेशन संबंधी अडचण येत आहे. तसेच काही वेळा आपणास हैंडसेट बदलून App दुसऱ्या हैंडसेट मधे घ्यायचे असते अशा वेळी आपणास App setting मधून काही बदल करावा लागतो.
                         १)  प्रथम सरल च्या website  वर जाऊन mdm  मध्ये login करा.  
                         २) home page  ओपन होईल. आता वरच्या आडव्या पट्टीवर म्हणजेच menu
                             bar वर APP Setting वर जाऊन येणाऱ्या पर्यायाला क्लिक करा 
                         ३) आता आपला मोबाइल नंबर दिसेल त्यापुढे Change  Device असे
                             नाव असेल त्यावर click करा 
                         ४) आता mdm  app  मध्ये जाऊन शाळेचा u - dise  टाकून मोबईल नं  टाका.  
                         ५) आता नवीन OTP  तुम्हाला प्राप्त होईल तो टाका.